आपल्या परिसरात बदल घडवायचा असेल तर बदल घडवणारे दूरदर्शी नेतृत्व लाभणे अत्यंत गरजेचे आहे... असेच एक दूरदर्शी नेतृत्व आपल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाला लाभले व गोरगरिबांना शिक्षण देणारे शिक्षणाचे केंद्र म्हणून आपल्या खडकवासला भागाची ओळख निर्माण झाली.. हे नेतृत्व म्हणजेच काकासाहेब चव्हाण... आपले सर्वांचे हक्काचे "काका" ! आपल्याला इच्छा असूनही परिस्थितीमुळे शिक्षणाचे स्वप्न अर्ध्यावर सोडावे लागले... याचे शल्य काकांच्या मनात कायम होते. इतरांचे दुःख कमी करून त्यातच आपले सुख शोधायचे हाच काकांचा स्वभाव... म्हणूनच शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला ज्या अडचणींचा सामना करावा लागला त्या अडचणी इतर होतकरू विद्यार्थ्यांच्या जीवनात येऊ नयेत यासाठी काकासाहेबांनी समर्पित भावनेने काम सुरू केले.
Read more